`संपूर्ण देश सेन्सॉर बोर्ड झालाय`
उडता पंजाब या चित्रपटाविषयी सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे.
मुंबई : उडता पंजाब या चित्रपटाविषयी सेन्सॉर बोर्डानं घेतलेल्या भूमिकेवर चौफेर टीका होत आहे. सेन्सॉर बोर्डाविरोधात सगळं बॉलीवूड एकवटल्याचं चित्र आहे. उडता पंजाबच्या या वादामध्ये प्रसिद्ध अभिनेता इरफान खाननंही उडी घेतली आहे.
संपूर्ण देशच सेन्सॉर बोर्ड झाला आहे. जरा कोणी वेगळे विचार मांडले, वेगळी भूमिका घेतली, तर त्याच्यावर टीका केली जाते, असं म्हणून इरफान खाननं केंद्रातल्या मोदी सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
चित्रपट उद्योग वर्षाला 4 हजार कोटींचा कर देतो. या कामगिरीमुळे आमचं कौतुक व्हायला पाहिजे पण आमच्याबाबतीत उलटंच होतं, असंही इरफान खान म्हणाला आहे.