मुंबई : 'बाहुबली २ द कनक्लूजन' या सिनेमाला जगभरात बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळतयं. बाहुबलीनंतर या सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास साऱ्यांनाच होता. मात्र इतका मोठा प्रतिसाद मिळेल याची कल्पना कोणी केली नव्हती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाहुबली २ला एकीकडे मोठे यश मिळत असले तरी दुसरीकडे बाहुबलीचा हिरो प्रभास मात्र यामुळे वैतागलाय. त्याला सतत अभिनंदनाचे मेसेजेस, नातेवाईक, मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. 


शुक्रवारी सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रभासला नीट झोपताही आलेले नाही. गेल्या ४८ तासांपासून तो झोपलेला नाहीये. याचा एकीकडे आनंद असला तरी मात्र या सर्व गोष्टींना प्रतिसाद देताना त्याची चांगलीच दमछाक होतेय.