मुंबई : 'झी स्टुडिओ' निर्मित आगामी 'सैराट' या चित्रपटाची सध्या सर्वत्रच जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला त्यामुळे तर ही उत्सुकता अजूनच वाढलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाण्यांमधून 'झिंगाट' नृत्य करणाऱ्या आणि 'सैराट झालं जी' म्हणत प्रेमाची नवी परिभाषा सांगणाऱ्या या सिनेमातील नायक नायिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलंय. पण, या चित्रपटात आणखी काही जमेच्या बाजू आहेत... ज्यामुळे हा सिनेमा मस्ट वॉच झालाय.... पाहुयात... 


१) जगभर गाजलेल्या फॅन्ड्री हा चित्रपट बनवणारा दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांचा हा दुसरा चित्रपट... बस नाम ही काफी है...


२) अजय-अतुल या प्रतिभावंतांनी या सिनेमाला दिलेलं संगीत


३) बर्लिन अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०१६ मध्ये सहभागी झालेला एकमेव मराठी चित्रपट


४) बर्लिन अंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट


५) हॉलीवूडमध्ये संगीत रेकॉर्डिंग झालेला 'सैराट' हा केवळ मराठीच नव्हे तर भारतातील पहिला चित्रपट ठरलाय


६) रिंकू राजगुरु या इयत्ता नववीत शिकणाऱ्या अकलूजच्या (सोलापूर) पोरीने पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला


७) 'पिस्तुल्या', 'फँड्री' आणि आता 'सैराट' या तिन्ही चित्रपटासाठी अनुक्रमे सुरज पवार, सोमनाथ अवघडे आणि रिंकू राजगुरु यांना सलगपणे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन हॅट्रिक साधणारा कदाचित एकमेव भारतीय चित्रपट दिग्दर्शक - नागराज पोपटराव मंजुळे


८) नवख्या नॉन-एक्टर पोरांना घेऊन अफलातून अविश्वसनीय काम करून घेणारा दिग्दर्शक अशी आपली ओळख मंजुळे यांनी बनवलीय


९) खऱ्या अर्थाने सिनेमॅटिक लँग्वेजचा वापर करणारा, प्रखर सामजिक भान असणारा, जातीपातीला विषमतेला मुठमाती देण्यासाठी झटणारा दिग्दर्शक - नागराज पोपटराव मंजुळे


१०) आत्तापर्यंत प्रदर्शित झालेले दर्जेदार टीजर व प्रेक्षकांची मनं जिंकणारी गाणी 


११) आकाश ठोसर हा मराठी चित्रपट सृष्टिला गवसलेला योग्य वयातील हॅण्डसम हिरो
 
१२) आपल्या अपेक्षा खोट्या ठरवत आपल्या गुळगुळीत झालेल्या अभिरुचिला धक्का देणारा व नव्यानं चित्रपटाची भाषा समजून सांगणारा चित्रपट