मुंबई : लष्कराला पाच कोटी रुपये द्यायचा प्रश्नच नाही, असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं केलं आहे. फरहान अख्तरचं प्रोडक्शन हाऊस असलेलं एक्सेल इंटरटेनमेंट शाहरुख खानच्या रईस चित्रपटाचं सहनिर्माता आहे. रईस चित्रपटामध्ये पाकिस्तानी कलाकार माहिरा खान आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्करानंही या रकमेचा उल्लेख पाच कोटी रुपये केला आहे आणि ही रक्कम नाकरली आहे, असं फरहान अख्तर म्हणाला आहे. लष्कराच्या या भूमिकेचंही फरहाननं कौतुक केलं आहे. आम्ही कर भरतो त्यामुळे आम्हाला सुरक्षा द्यायची जबाबदारी सरकारची असल्याची प्रतिक्रियाही फरहाननं दिली आहे.


ए दिल है मुश्किलमध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे मनसेनं या चित्रपटाला विरोध केला होता. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ए दिल है मुश्किलचा निर्माता करण जोहर आणि राज ठाकरेंमध्ये मध्यस्ती केली. यापुढे चित्रपटामध्ये पाकिस्तानी कलाकारांना घेणार नाही, तसंच लष्कराला कल्याण निधी म्हणून पाच कोटी रुपये देऊ असं आश्वासन करण जोहरनं दिल्यानंतर चित्रपटाच्या रिलीजचा मार्ग मोकळा झाला.