आयफा पुरस्कार सोहळ्यात दीपिका, रणवीरची बाजी
स्पेनमधील माद्रित इथं17व्या आयफा 2016 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटानं बाजी मारली.
माद्रिद : स्पेनमधील माद्रित इथं17व्या आयफा 2016 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या बाजीराव मस्तानी चित्रपटानं बाजी मारली.
बाजीराव मस्तानी चित्रपाटासाठी संजय लीला भंन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या पुरस्ताकारानं सन्मानित करण्यात आलं तर दीपिका पदुकोणला पीकू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर सलमान खानच्या बजरंगी भाईजानला सर्वोत्कृष्ट चित्रटाचा सन्मान मिळाला.
विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी
सर्वोत्कृष्ट चित्रपट - बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दीपिका पदुकोण(पिकू)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीर सिंग (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्री - प्रियंका चोप्रा(बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर (दिल धडकने दो)
सर्वोत्कृष्ट कथा - जुही चर्तुवेदी (पिकू)
वुमन ऑफ दी ईयर - प्रियंका चोप्रा
सर्वोत्कृष्ट पदार्पण जोडी - सूरज पंचोली आणि अथिया शेट्टी
सर्वोत्कृष्ट खलनायक - दर्शन कुमार (एनएच१०)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (महिला) - भूमी पेडणेकर (दम लगा के हैशा)
सर्वोत्कृष्ट पदार्पण (पुरुष) - विकी कुशल(मसान)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - मोनाली ठाकूर(दम लगा के हैशा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - पपोन(दम लगा के हैशा)