झहीर माझ्यापेक्षा छान मराठी बोलतो - सागरिका घाटगे
भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे एंगेज झाल्याचा फोटो सोशल मीडियावर आल्याने सध्या त्यांचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि बॉलीवूड अभिनेत्री सागरिका घाटगे एंगेज झाल्याचा फोटो सोशल मीडियावर आल्याने सध्या त्यांचीच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
एंगेमेंटचा फोटो सोशल मीडियावर ब्रेक झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने झहीरबाबतच्या काही गोष्टी तसेच लग्नाबाबतचे प्लान्स सांगितले.
साखरपुडा हे माझ्यासाठी एक प्रकारचे सरप्राईजच होते. तो प्रपोज कऱणार असल्याचे मला कळले होते. मात्र स्पर्धेच्या मध्यावधीत अचानकपणे करेल याची कल्पना नव्हती. त्यामुळे हे माझ्यासाठी सरप्राईजच होते, असे सागरिका म्हणाली.
लग्न कधी करणार असल्याचे सागरिकाला विचारले असता ती म्हणाली, लग्नाबाबत अद्याप काही ठरवलेले नाही. मी माझ्या पालकांशी सल्लामसलत करुनच लग्नाची तारीख ठरवली जाईल. आयपीएल संपल्यानंतर यावर चर्चा होईल.
झहीर आणि सागरिका दोघेही महाराष्ट्रीयन आहेत. यावेळी झहीरच्या मराठीविषयीही सागरिका भरभरुन सांगितले. झहीरच्या मराठी भाषेबाबत तिला विचारले असता ती म्हणाली, तो माझ्यापेक्षाही चांगले मराठी बोलतो. तो मनाने मराठी मुलगा आहे. मी बोर्डिंग स्कूलमध्ये होते त्यामुळे जे काही मराठी बोलायचे ते केवळ घरातच. मात्र झॅक(सागरिका झहीरला प्रेमाने या नावाने हाक मारते) मराठी शाळेत शिकलाय. त्यामुळे तो माझ्यापेक्षा चांगले मराठी बोलतो.