मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री झरीन खाननं आपले लहानपणीचे काही फोटो इन्साटग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोकडे बघितलं तर ही झरीनच आहे का यावर कदाचित तुमचा विश्वासही बसणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी नववी आणि 12वीमध्ये असतानाचे हे फोटो आहेत, तेव्हा मी जाडी असल्यानं माझ्यावर अनेकांनी टीका केली. पण त्याकडे जास्त लक्ष न देता मी फिटनेसवर भर दिला असं झरीन म्हणाली आहे. 



कोणीही माझ्याविषयी काहीही बोललं तरी हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे, आणि माझ्या शरिराचं मी काय करायचं हे ठरवण्याचा अधिकारही मला आहे, असं चोख प्रत्युत्तरही झरीननं दिलं आहे. 


अथक परिश्रमानंतर माझं वजन कमी झालं, मला आणखी वजन कमी करायचं आहे, अशी प्रतिक्रिया झरीननं दिली आहे.