मुंबई : चित्रगौरवसाठी ‘सैराट’, ‘रंगा पतंगा’, ‘कासव’ या चित्रपटांमध्ये चुरस आहे. पाहा झी चित्रगौरव पुरस्कारांच्या नामांकनाची संपूर्ण यादी... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष लक्षवेधी ठरलं ते ‘सैराट’च्या विक्रमी कामगिरीमुळे. मराठी चित्रपटसुद्धा शंभर कोटींचं स्वप्न बघू शकतो हा विश्वास सैराटने निर्माण केला. अजय-अतुलच्या संगीताची जादू आणि आर्ची-परश्याच्या प्रेमकथेने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. 


सैराटची ही जादू झी गौरवच्या नामांकनातही बघायला मिळाली. सैराटने उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री, उत्कृष्ट संगीतासहित अनेक महत्त्वाच्या विभागांत नामांकने मिळवली. 


आशयघन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयींच्या ‘कासव’नेही परीक्षकांचे लक्ष वेधत आठ नामांकने मिळवली आहेत. 


शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाच्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या संवेदनशिल ‘रंगा पतंगा’नेही सात नामांकने मिळवली आहेत. पुष्कर श्रोत्री या लोकप्रिय अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘उबंटु’ चित्रपटाने उत्कृष्ट चित्रपटासह इतरही महत्त्वाच्या विभागात नामांकने मिळवली आहेत.


झी चित्रगौरव पुरस्कार २०१७ नामांकने


उत्कृष्ट वेशभूषा 


1.    सचिन लोवळेकर - हाफ तिकीट
2.    रश्मी रोडे - रंगा पतंगा 
3.    अपर्णा गुरम - एक अलबेला



उत्कृष्ट रंगभूषा 


1.    विद्याधर भट्टे - एक अलबेला 
2.    संतोष गायके - हाफ तिकीट
3.    श्रीकांत देसाई - रंगा पतंगा



उत्कृष्ट कलादिग्दर्शन


1.    वासू पाटील - हाफ तिकीट
2.    संतोष फुटाणे - उबंटु
3.    बबन अडगळे - एक अलबेला


उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन 


1.    सुजीत कुमार – “उबंटु उबंटु” - उबंटु
2.    राहूल - संजीव – “ओ काका” - वाय झेड
3.    उमेश जाधव – “फिल्मी फिल्मी हुआ” - गुरु


उत्कृष्ट संकलन


1.    मोहित टाकळकर - कासव
2.    रामेश्वर भगत - व्हेंटिलेटर
3.    फैजल - इम्रान - हाफ तिकीट


उत्कृष्ट छायाचित्रण


1.    संजय मेमाणे - हाफ तिकीट
2.    धनंजय कुलकर्णी - कासव
3.    संजय मेमाणे - नदी वाहते


उत्कृष्ट ध्वनिरेखाटन 


1.    अविनाश सोनावणे - सैराट
2.    अनमोल भावे - उबंटु
3.    सुहास राणे - नदी वाहते


उत्कृष्ट पार्श्वसंगीत 


1.    अजय-अतुल - सैराट
2.    संकेत कानेटकर - कासव
3.    नरेंद्र भिडे – उबंटु


उत्कृष्ट गीतकार


1)    समीर सामंत – “माणसाने माणसाशी” - उबंटु
2)    इलाही जमादार – “ऐ सनम” - रंगा पतंगा
3)    अजय गोगावले – “झिंगाट” – सैराट


उत्कृष्ट पार्श्वगायिका 


1)    सावनी रविंद्र – “मगन मन मस्त मलंगा” - वन वे तिकीट
2)    श्रेया घोषाल – “आताच बया का बावरलं” - सैराट
3)    नेहा राजपाल – “ओली ती माती” – फोटोकॉपी


उत्कृष्ट पार्श्वगायक 


1.    आदर्श शिंदे – “ऐ सनम” - रंगा पतंगा
2.    अजय गोगावले – “याड लागलं” - सैराट
3.    गौरव ढगावकर – “मगन मन   मस्त मलंगा” - वन वे तिकीट



उत्कृष्ट संगीत


1.    अजय-अतुल - सैराट
2.    गौरव ढगावकर - वन वे तिकीट
3.    कौशल इनामदार - रंगा पतंगा



उत्कृ्ष्ट कथा 


1.    राजन खान - हलाल
2.    गिरीश जोशी - टेक केअर गुडनाईट
3.    अंबर हडप, गणेश पंडित, जतीन वागळे - बंध नायलॉनचे


उत्कृष्ट पटकथा


1.    सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर - कासव
2.    गिरीश जोशी - टेक केअर गुडनाइट
3.    राजेश मापुसकर - व्हेंटिलेटर 


उत्कृष्ट संवाद 


1.    सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर - कासव
2.    नागराज मंजुळे - भारत मंजुळे - सैराट
3.    गिरीश कुलकर्णी - जाऊंद्याना बाळासाहेब


उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री


1.    स्मिता तांबे - गणवेश
2.    प्रियांका कामत बोस - हाफ तिकीट
3.    पूनम शेडगावकर - नदी वाहते


उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता 


1.    प्रियदर्शन जाधव - हलाल
2.    सारंग साठे - उबंटु
3.    संदीप पाठक - रंगा पतंगा


उत्कृष्ट बालकलाकार 


1.    आर्य आढाव - दशक्रिया
2.    शुभम मोरे, विनायक पोतदार - हाफ तिकीट
3.    भाग्यश्री शंखपाल - उबंटु


उत्कृष्ट अभिनेत्री


1.    इरावती हर्षे - कासव
2.    पर्ण पेठे - फोटोकॉपी
3.    रिंकू राजगुरु – सैराट



उत्कृष्ट अभिनेता 


1.    मकरंद अनासपुरे - रंगा पतंगा
2.    आकाश ठोसर - सैराट
3.    गिरीश कुलकर्णी - जाऊंद्याना बाळासाहेब



उत्कृष्ट दिग्दर्शक 


1.    सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर - कासव
2.    नागराज मंजुळे - सैराट
3.    राजेश मापुसकर - व्हेंटिलेटर


उत्कृष्ट चित्रपट


1.    सैराट - झी स्टुडिओज्
2.    व्हेंटिलेटर - पर्पल पेबल पिक्चर्स व मॅगीज पिक्चर्स
3.    कासव - विचित्र निर्मिती
4.    टेक केअर गुडनाईट - एस.पी. एंटरटेन्मेट प्रा. लि.
5.    उबंटु - फेबल फॅक्टरी