लातूर : रक्त्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लातूरमध्ये घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्ह्यातल्या उदगीर शहरामध्ये जन्मदात्या आईची हत्या तिच्या सख्ख्या एकुलक्या एक मुलानंच केल्याचं समोर आलं आहे. 


प्रणिता पेन्सलवार यांची २६ मे रोजी त्यांच्या राहत्या घरी हत्या झाली होती. त्यावेळी घरातच असलेला त्यांचा १६ वर्षांचा मुलगा किरकोळ जखमी झाला होता. मात्र, पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आलं आणि पोलिसांनाही धक्काच बसला.


म्हणून केली त्यानं जन्मदात्रीची हत्या


ही हत्या आपणच सुपारी देऊन केल्याची प्रत्यक्ष कबुली प्रणिता पेन्सलवार यांच्या मुलानं दिली आहे. प्रणिता यांचं किराणा दुकान होतं. त्या दुकानाच्या गल्ल्यातून १० वीची परीक्षा दिलेला हा मुलगा सतत चोरी करायचा. त्यामुळे प्रणिता त्याच्यावर रागावल्या होत्या. 


सव्वा तीन लाखांची सुपारी


शिवाय त्याच्या वाईट संगतीबाबतही त्या त्याची नेहमी कानउघडणी करायच्या. त्याचाच राग मनात ठेऊन या मुलानं, परभणी जिल्ह्यातल्या पालम इथल्या पाच आरोपींना सव्वा तीन लाखांची सुपारी देऊन ही हत्या करवली. 


मिसरुडही न फुटलेले मारेकरी


आणखीन धक्कादायक म्हणजे, पैशांसाठी आपल्या मित्राच्या आईची हत्या करणारे सगळे आरोपी केवळ १८ ते २० वर्ष वयोगटातले आहेत.