छेडछाडीला कंटाळून नांदेडमध्ये १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या
एकतर्फी प्रेमातून सुरु असलेल्या छेडछाडीला कंटाळून नांदेडमध्ये एका 18 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केलीये. हादगाव तालुक्यातील भाटेगाव येथे ही घटना घडलीये.
नांदेड : एकतर्फी प्रेमातून सुरु असलेल्या छेडछाडीला कंटाळून नांदेडमध्ये एका 18 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केलीये. हादगाव तालुक्यातील भाटेगाव येथे ही घटना घडलीये.
प्रतीक्षा जाधव असं या तरुणीचं नाव आहे. गावातील विशाल शिंदे याचं या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. त्यातून तो या मुलीला रोज त्रास द्यायचा.
सतच्या त्रासाला कंटाळून प्रतिक्षानं ६ दिवसांपूर्वी स्वत:ला पेटवून घेतलं होतं. उपचारादरम्यान तिचा अखेर मृत्यू झालाय. या प्रकरणी हादगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विशाल शिंदे फरार आहे..