रायगड : मुरूडच्या समुद्रात पुण्याच्या 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील पर्यटकांच्या सुरक्षेचा मुददा ऐरणीवर आला होता . आता सागरी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या योजनेतून चार तालुक्यात वीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समुद्र किना-यावरील आपत्ती निवारणासाठी उपाययोजना करण्यासाठी लागणा-या वस्तू आणि सामानाच्या या निधीतून खरेदी करण्यात येणार आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण नगर पालिकांना प्रत्येकी अडीच लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आलेत. 


अलिबाग तहसिलदार कार्यालयाला पाच लाख, श्रीवर्धन आणि मुरुड तहसिलदारांना प्रत्येकी दोन लाख तर उरण तहसिलदारांना एक लाख रुपयांचा निधीही वर्ग करण्यात आलाय. अलिबाग नगर परिषदेने यातून आवश्यक वस्तू खरेदी केल्या असून त्या वापरासाठी जीवरक्षकांकडे सुपूर्द करण्यात आल्यात..