पिंपरी चिंचवड : शनिवारी झालेल्या हत्येने खळबळ उडालीय. भोसरीमध्ये संध्याकाळी साडे सहाच्या सुमाराला विकास माळी या २० वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विकास माळी याच्यावरही याआधी हत्येचा आरोप होता. विकास हा त्याच्या भागातल्या काही तरूणांना त्रास देत होता. त्यात त्यांचे अनेकदा खटकेही उडत होते.
 त्यातूनच विकासची हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. 


भोसरी पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केलीय. तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय.