धुळे : प्रेमविवाह करणाऱ्या धुळ्यातील एका दाम्पत्यानं लग्नाच्या २५ वर्षानंतर पुन्हा लग्न केलंय. धर्माच्या भिंतीचा अडसर आणि विरोधाला न जुमानता या दाम्पत्यानं रेशीमगाठ बांधली होती. २५ वर्षानंतर पुन्हा त्यांचं लग्न मोठ्या थाटात संपन्न झालं. चला तर मग पाहूया एका लग्नाची ही दुसरी गोष्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाती, धर्माच्या आलेल्या अडचणी आणि त्यावर मात करत एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणारे सीमा आणि सुहास चांदेलकर दांपत्य. लग्नाच्या २५ वर्षांची वर्षपूर्ती साजरी करत आहे. त्यानिमित्तने चांदेलकर दांपत्याने नातलग आणि समाजा समक्ष पुन्हा सप्तपदी घेतली. २५ वर्षांपूर्वी विणली गेलेली ही रेशीमगाठ अधिक घट्ट आणि दृढ होण्यासोबत इतरांनाही आदर्श ठरली आहे. २४ जानेवारी १९९१ रोजी शहरातील सीमा सुहास चांदेलकर यांनी जातीपातीच्या भिंतींना छेद देऊन नोंदणी विवाह केला. 


मुलगा वेदांत, जावई यांनी सुखी संसाराची २५वा विवाह वर्धापनदिन वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचे ठरविले. सगळ्यांना विचार सांगितला. नियोजन ठरले. पत्रिका, विवाहस्थळ एवढेच नव्हे तर सायंकाळी साडेसहा वाजेचा गोरज मुहूर्तही ठरला. वधु-वराला हळदही लावली. मित्रमंडळी, गोतावळा आणि नातलगांच्या साक्षीने चांदेलकर दाम्पत्य पुन्हा एकदा रेशीमगाठीत बांधले गेले. यशस्वी सहजीवनाची ही सिल्वर ज्युबली इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.