सोलापूर : करमाळा जेलमधून 3 आरोपी फरार झाले आहेत. पोलीस ठाण्यातील जेलच्या दरवाजाचे गज वाकवून हे आरोपी पळाले. या तिघांना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यापैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय.


पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली. करमाळ्यातील हे जेल ब्रिटीश कालीन आहे. पळालेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.