ठाणे : ठाण्यात दिवसेंदिवस तापाचे आणि डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची माहिती मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत समोर आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील तीन दिवसात तीन जणांचा डेंग्यूने मृत्यु झाल्याची माहिती आरोग्य विभागाने यावेळी बैठकीत दिलीय. तर आतार्पयत 237 जणांना डेंग्युची लागण झालीय.  824 डेंग्युचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ठाणेकरांचे आरोग्य सुस्थितीत आणण्यासाठी उपाय योजना काय करणार असा सवाल सर्व पक्षीय सदस्यांनी आरोग्य विभागाला विचारला.  


सध्या पावसाळी वातावरण आहे पण जोरदार पाऊस मात्र पडत नाही. त्यामुळे डेंग्यूसारख्या रोगांच्या प्रादुर्भावाला पोषक वातावरण आहे. मुंब्य्रात एकाच दिवसात दोघांचा डेंग्युने मृत्यु झाला. 8848 घरातील पाण्याचे टँक तपासल्यावर,  755 ठिकाणी डेंग्युच्या आळ्या आढळून आल्या आहेत. एकट्य़ा मुंब्र्यात साडे तीनशेहून अधिक डेंग्यूचे संशयित आढळलेत.


मुंब्य्रातील ठाकुरपाडा, रशीद कपांऊड, आदींसह इतर भागातही डेंग्युचे रुग्ण आढल्याचे सांगितले. तसेच यावर उपाय म्हणून या भागात फवारणीचे कामही सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.