अमरावती :  'देव तारी, त्याला कोण मारी' अशी म्हण आहे.... याचाच प्रत्यय आलाय अकोल्यातील डॉ. सुरेश मुंदडा यांच्यासह त्यांची पत्नी आणि गाडीचालकाला.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी रात्री बाराच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील दर्यापुरवरून अकोल्याकडे येताना त्यांची गाडी नाल्याच्या पुरात वाहून गेलीय. मात्र वाहून गेलेली गाडी एक बाभळीच्या झाडाला अडकली अन हे तिघेजण चक्क मृत्यूच्या दाढेतून परत आलेत. 


डॉ. मुंदडा यांनी तशाच परिस्थितीत गृहराज्यमंत्री डाँ रणजीत पाटील यांना मोबाईलवरून मदत मागितली.  रणजीत पाटील यांनी जिल्हाप्रशासनाला आदेश देत तातडीनं हालचाली केल्या आणि तब्बल पाच तासांच्या 'रेस्क्यू ऑपरेशन'नंतर या तिघांना पुरातून बाहेर काढण्यात यश आलंय. 


अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध पथकानं या तिघांची सुटका केली. मृत्यूच्या दारातून डॉक्टर मुंदडा दाम्पत्य आणि त्यांचा ड्रायव्हर बाहेर आलाय. 


आपण एवढ्या मोठ्या संकटावर मात करून जिवंत परतलोय, यावर या तिघांचा अद्यापही विश्वास बसत नाहीये. आपला पुनर्जन्म झाल्याचा आनंद सध्या या तिघांच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळतोय...मध्यरात्री पासून पहाटेपर्यंत जीवन-मृत्यूच्या रेषेवर असलेला हा सगळा थरार ऐकूया डॉक्टरांच्या तोंडून...


पाहा व्हिडिओ...