मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोट्याधीश आणि लखपती उमेदवारांची चांगलीच चर्चा होतेय. निवडणुकीत ३० उमेदवार कोट्याधीश आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोट्याधीश उमेद्वारांमुळे महापालिकेची निवडणूक वजनदार झालीय. कोट्यधीश उमेदवारांमध्ये नरेंद्र सोनवणे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. सोनवणे प्रभाग 8 मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतायत. 


त्यांच्याकडे 16 कोटींहून अधिक संपत्ती आहे. तर राष्ट्रवादीचे अहमद नबींकडे 6 कोटी 21लाख 97 हजार , काँग्रेसच्या मंगलाबाई भामरेंकडे 5कोटी ८६ लाख 39हजार आणि  शिवसेनेच्या ज्योती भोसलेंकडे 4कोटी 30लाख,32हजारांची संपत्ती आहे.