नागपूर : सर्वांसमोर झालेल्या अपमानस्पद मारहाणीमुळे निराश झालेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपुरात घडली... जेम्स जोसेफ असे मृतक तरुणाचं नाव आहे. तर मारहाण करणारी प्रेयसी आणि तिचा मित्र दोन्ही पोलीस खात्यात नोकरीला आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतील मार्टिन नगर इथे ३१ वर्षीय जेम्स जोसफ राहत होता.  छावणी परिसरातील एका खाजगी जिममध्ये तो ट्रेनर म्हणून कामाला होता. घराशेजारीच राहणाऱ्या युवतीशी त्याचे प्रेम संबंध होते.. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होता. 


अशातच २४ एप्रिलला रात्रीच्या सुमारास युवतीच्या पोलीस दलातील एका मित्राने येऊन जिममध्येच मारहाण जोसेफला मारहाण केली.दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्या युवतीने आपल्या मित्रासह येऊन जिमच्या बाहेर जेम्सला जबर मारहाण केली. 


आत्महत्येपूर्वी जेम्सने कुठलीही सुसाईड नोट ठेवली नाही... मात्र जिम मध्ये दोनदा सर्वांसमोर मारहाण होऊन अपमान झाल्यानेच जेम्सने आत्महत्या केल्याचा जेम्सच्या नातेवाईकांचा आरोप आहे.