३५ टक्के पुणेकर चालण्याच्याबाबतीत आहे आळशी
आजच्या धक्काधुक्कीच्या जीवनात माणूस सतत धावत असतो. मुंबईत तर माणूस हा सतत धावत असतो. पण पुण्याच्या बाबतीत एका सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे : आजच्या धक्काधुक्कीच्या जीवनात माणूस सतत धावत असतो. मुंबईत तर माणूस हा सतत धावत असतो. पण पुण्याच्या बाबतीत एका सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
३५ टक्के पुणेकर हे चालण्याच्या बाबतीत आळशी आहे. मुंबई, पुणे आणि जयपूर या शहरातील १३०० हून अधिक व्यक्तींची मतं यात नोंदवण्यात आली. पुणेकरांच्या नियमित चालण्यात सर्वांत मोठा अडथळा रोजचा उशिरापर्यंतचा प्रवास आहे. या शिवाय आणखी अनेक कारणांची नोंद यामध्ये करण्यात आली.
पुणेकरांमध्ये रक्तदाबाचे १५ टक्के, मधुमेहाचे १० टक्के, कोलेस्टेरॉल १० टक्के, स्थूलता १० टक्के, पाठीच्या समस्या ११ टक्के तर कमजोर नजर याचे १६ टक्के समस्या दिसून येतात. जे ६५ टक्के पुणेकर चालण्याचा व्यायाम करतात त्यामागे स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा हेतू असतो.