पुण्यात वाहन जळीतकांड सुरुच
पुण्यात पुन्हा एकदा गाड्या जाळण्याचा प्रकार समोर आलाय. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील नेहरु चौकात ही घटना घडलीये.
पुणे : पुण्यात पुन्हा एकदा गाड्या जाळण्याचा प्रकार समोर आलाय. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील नेहरु चौकात ही घटना घडलीये.
रहिवासी शोएब बागवान यांच्या पाच गाड्या जाळण्यात आल्यात. पहाटे तीन वाजता दोन जण बाईकवरुन आले होते. त्यांनी बाइक जाळल्याचे सीसीटीव्हीमधून निदर्शनास आले आहे.
दरम्यान, गाड्या जाळण्याचे प्रकार पुण्यात सुरु असून या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.