५ लाखाची लाच, ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा
तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क अधिकारी विजयकुमार चिंचाळकर याला ५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि १० हजारांचा दंड ठोठवण्यात आलाय. रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय.
रत्नागिरी : तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क अधिकारी विजयकुमार चिंचाळकर याला ५ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि १० हजारांचा दंड ठोठवण्यात आलाय. रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय.
परवाना नुतनी करण्यासाठी चिंचाळकरांनी लाच मागितली होती. चिंचाळकर सध्या कोल्हापूर परीक्षेत्राचा अधीक्षक आहे. गुहागर तालुक्यातील एका दारू दुकानाच्या नूतनी कारणासाठी रत्नागिरी चा तत्कालीन जिल्हा अधीक्षक असलेल्या चिंचाळकरने तब्बल १० लाख रुपयांची मागणी या घोसाळकर कुटुंबाकडे केली होती.
वरिष्ठ पातळीवरून रत्नागिरी उत्पादन शुल्क कार्यालयाला घोसाळकर यांच्या नूतनीकरणाच्या अर्जावर कार्यवाहीचे आदेश आले तरी चिंचाळकर यांनी त्यांची नूतनीकरणाचा परवानगी रोखून ठेवली . आणि १० लाखाची मागणी कायम ठेवली. अखेर घोसाळकर कुटुंबीयांनी चिंचाळकर याला दहा लाखापैकी पाच लाख स्वीकारताना पकडून दिले.