काकूकडून पाच वर्षाच्या पुतण्याची हत्या
आपल्याला मुलगा होत नाही म्हणून काकूने आपल्या पाच वर्षाच्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पुण्याच्या हडपसर येथे ही घटना घडलीये.
पुणे : आपल्याला मुलगा होत नाही म्हणून काकूने आपल्या पाच वर्षाच्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पुण्याच्या हडपसर येथे ही घटना घडलीये.
अनिता खांडेकर असं या आरोपी महिलेचे नाव असून तिला अटक कऱण्यात आलीये. माऊली विनोद खांडेकर असं मृत मुलाचे नाव आहे. अनिताच्या जावेला
आपल्याला मुलीच आहेत, मुलगा नाही, मात्र शेजारी राहणाऱ्या धाकट्या जावेला मुलगा आहे. या कारणामुळे अनिताला सतत हिणवले जात असे. त्या रागातूनच तिने आपल्या पुतण्या माऊलीची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये लपवून ठेवला.
गुरुवारी सकाळी चिमुकला माऊली बेपत्ता झाल्याचे घरच्यांना समजले. त्यामुळे त्यांनी तातडीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी तपास केला असता माऊलीची हत्या अनिता यांनी केल्याचे समोर आले.