भंडारा : गोसेखुर्द धरणातील कालवे शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरत असले, तरी पवनी तालुक्या अंतर्गत गोसेखुर्द धरणाचे उजवे कालवे उमरेड करांडला अभयारण्यालगत आहेत. त्यामुळे ते वन्य प्राण्यांसाठी घातक ठरत असून पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी कालव्यात बुडून मृत्यूमुखी पडलेत. अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाण्याच्या शोधात असलेला रानगवा या कालव्यात पडला. वनविभागाने मैत्र संरक्षण आणि संवर्धन संस्थेच्या पदाधिका-यांना सोबत घेऊन कालव्यात पडलेल्या रानगव्याला बाहेर काढण्याची मोहिम हाती घेतली. 


अथक प्रयत्नांनंतर दोरीच्या सहाय्याने सहाशे किलो वजनाच्या या रानगव्याला बाहेर काढण्यात यश आलं. बाहेर येताच या रानगव्याने रौद्ररुप धारण करत ग्रामस्थांवर धाव घेतली. सुदैवाने यांत कुणीही जखमी झालं नाही.