कणकवली :  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीच्या बेळणे गावाजवळ गुरुवारी मासे घेऊन जाणारा कंटेनर आणि लक्झरी बस यांच्यात अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघातात ४ जण जागीच ठार झाले तर २८ जण जखमी झाले असून यापैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. 


अपघात एवढा भीषण होता, की दोन्ही वाहनाचा चक्काचूर झालाय. अपघातातील जखमींना ओरोस कणकवली आणि गोवा येथील रुग्णालयात हलवण्यात आलेय.