नाशिक : खासगी गाडीतून नेण्याची मागणी करत आरोपींनी दोन पोलिसांनाच जोरदार मारहाण केली. या मारहाणीत पोलीस जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांना गाडीतून घेऊन निघालेल्या पोलिसांनाच नाशिकमध्ये सात कैद्यांनी मारहाण केली. यामध्ये नाशिक ग्रामीण विभागाचे हे पोलीस कर्मचारी आहेत. सर्व आरोपींविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


न्यायालयात नेत असताना गाडीत बसण्यासाठी जागा नाही, असे कारण देत सुरुवातीला आरोपींनी पोलिसांशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी मारहाण सुरू केली. 


दुहेरी हत्याकांड प्रकरणात जानेवारीमध्ये पकडलेले पाच आरोपी आणि अन्य गुन्ह्यातील दोन आरोपींना खटल्याच्या सुनावणीसाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून नाशिकमधील न्यायालयात नेण्यात येत होते. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांड प्रकरणातील याच पाच आरोपींना न्यायालयात नेण्यात आले होते. त्यावेळी तिथे नाशिकमधील एका नगरसेवकाकडून या आरोपींना पाण्याच्या बाटलीतून मद्य देण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने शिवीगाळ केली होती.