पुणे : बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीने आरोपीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. पुण्यात ही धक्कादायक घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आरोपीला राजकीय पाठबळ असल्यामुळे पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी केला आहे. अजित गावडेवर बलात्काराचा आरोप आहे. अजित गावडेवर बलात्कारासारखा गंभीर गुन्हा  दाखल होवूनही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.


धक्कादायक बाब म्हणजे आरोपीच्या जाचाला कंटाळून पीडित तरुणीने आत्महतेचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी गंभीर आऱोप केलाय. आरोपी अजित गावडेचे आजोबा पोपटराव गावडे हे शिरूरचे माजी आमदार असून ते आपले राजकीय संबंध वापरुन पोलिसांवर दबाव आणत आणत असल्याचा आरोप पीडित तरुणीच्या नातेवाईकानी केलाय.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अजित गावडेने पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवले होते तसेच तिची अश्लील चित्रफीत तयार केली होती. त्या चित्रफितीच्या आधारे आऱोपी अजित गावडेने  बलात्कार केल्याचा आरोप  पीडित तरुणीने केला. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी पी़डित तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीतून ही बाब उघड झाली आहे.


या प्रकरणातील पीडित मुलीला तसेच तिच्या नातेवाईकांना धमकावले जात आहे. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतलीय. या सगळ्या परिस्थितीमुळे पीडित तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केलाय.