प्रशांत शर्मा, शिर्डी : शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले शिर्डी विमानतळाचं काम आता पूर्ण झालंय. या विमातळाच्या धावपट्टीची चाचणी घेण्यासाठी पहिल्या चार्टड विमानाचं लॅन्डिंग करण्यात आलं. येत्या  मे महिन्यापासून नियमित विमान उड्डाणाला सुरुवात होणार.


मुंबईतून शिर्डीसाठी पहिल्या चार्टर्ड विमानाचं उड्डाण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी निधीअभावी तर कधी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे शिर्डी विमानतळाचं काम वारंवार ठप्प होत होतं. पण आता विमानतळाच्या अडीच किलोमीटर लांबीच्या धावपट्टीचं काम पूर्ण झालंय. शिर्डीपासून दहा किलोमीटरवर असलेल्या काकडी या छोट्याशा गावात अकराशे एकर जमिनीवर विमानतळ बांधण्यात आलंय. विमानतळासाठी साईबाबा संस्थानच्या दानपेटीतील ५० कोटी तर उर्वरित रक्कम महाराष्ट्र सरकारनं दिलीय. 


यावेळी काकडी गावाच्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पण विमानतळासाठी जागा घेताना कबूल केलेल्या सुविधा दिल्यानंतरच पूर्ण क्षमतेनं विमानतळ सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी विश्वास पाटलांना भेटून केली. 


विमानतळ धावपट्टीच्या चाचणीसाठी चाचणी घेण्यात आली...येत्या मे महिन्यापासून नियमितपणे विमान उड्डाणाला सुरुवात होणार आहे.