राज ठाकरेंनी तोडपाणी केलं का?- अजित पवार
ए दिल है मुश्किलच्या वादावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरेंनी देशाचा अपमान केला.
पिंपरी चिंचवड : ए दिल है मुश्किलच्या वादावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरेंनी देशाचा अपमान केला. देशाची किंमत पाच कोटी केली का? असं अजित पवार म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी तोडपाणी केलं का काय अशी शंका येत असल्याचंही अजित पवार बोलले आहेत. मनसेनं आत्तापर्यंत एकही मुद्दा तडीला नेला नसल्याचा आरोपही अजित पवारांनी केला आहे.
नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढेंवरही अजित पवारांनी निशाणा साधला आहे. तुकाराम मुंढेविरोधातला ठराव सर्व पक्षाचे नगरसेवक करत आहेत. याचा अर्थ मुंढे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.