रायगड: अजित पवार आणि सुनिल तटकरे हे यंदाच्या दिवाळीत तुरुंगात असतील, असं वक्तव्य भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे. तसंच तटकरेंनी माझ्यावर गुंडांकरवी दबाव आणला असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आघाडी सरकारच्या काळामध्ये सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं वारंवार केला आहे. सिंचन घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात टाकू अशी वक्तव्य निवडणुकीआधी भाजपच्या नेत्यांनी वारंवार केली होती.


 महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समिर भुजबळ हे अटकेत आहेत. या दोघांच्याही अटकेआधी सोमय्या यांनी भुजबळांना अटक होणार असं जाहीर वक्तव्य केलं होतं. पण ईडीकडून होणाऱ्या कारवाईची सोमय्यांना आधी माहिती कशी मिळते, सरकार सुडबुद्धीनं वागत आहे, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.