बारामती : मराठा समाजाची आरक्षणाची मागणी, अॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि कोपर्डी प्रकरणातील दोषींना फाशीच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून विराट मोर्चे काढण्यात येत आहेत. मराठा आरक्षणाच्या या मागणीबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्या सकट सगळ्यांना आरक्षण पाहिजे, दुसरीकडे मिरवायलाही पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत. लग्नसमारंभ आला की हे सगळे आरक्षण मागे ठेवून आम्ही कसे वरच्या दर्जाचे आहोत, हे सांगायला विसरत नाहीत, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे. 


याबाबत मी खूप ऐकलंय, पण आता मला सगळ्यांची गरज असल्यानं मी जास्त बोलत नाही. मागे काय काय बोलून माझं लय वंगाळ काम झालं आहे, अशी टोलेबाजी अजितदादांनी केली आहे. मराठा समाज एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक होत असताना अजित पवार यांचं हे वक्तव्य अजित पवारांना अडचणीत आणू शकतं.


पाहा अजित पवारांची टोलेबाजी