औरंगाबाद : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सत्तेतील आपली पावर वापरत, स्वत:च्या संस्थेसाठी ५ कॉलेज मिळवली असल्याचा आरोप होतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यापीठानं पाठवलेल्या 29 प्रस्तावांपैखी फक्त 5 कॉलेजसला मान्यता मिळाली आहे आणि ही सर्व दानवे आणि त्यांच्या संबंधितांची असल्याचा आरोप होतोय.


माहितीच्या अधिकारात हा सगळा प्रकार उघड झाला आहे. आता या प्रकरणाबाबत विद्यापीठांनं मात्र कानावर हात ठेवलेत.


कुलगूरूंनी याबाबत एक शब्दही न बोलता थेट बीसूयीडी यांच्या अखत्यारीतील प्रकरण आहे म्हणून हात झटकले तर बीसीयूडी सतिश पाटील यांनी कॉलेजांना अंतिम मंजूरी देण्याचा अधिकार शासनाचा असल्याचं सांगून हात वर केलेत.


आता विद्यापीठाची समिती प्रकरणाची पूर्ण चौकशी करून शहानिशा करणार का, कि सत्ताधारी आहे म्हणून सुट देणार हेच पाहणं महत्वाचं ठऱणार आहे.