दमानिया-खडसेंचे स्वीय सहायक यांच्यात खडाजंगी
जळगावमध्ये आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि खडसेंचे स्वीय सहायक योगेश कोलते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
मुक्ताईनगर : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी जळगावमध्ये आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि खडसेंचे स्वीय सहायक योगेश कोलते यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
मुक्ताईनगरमधल्या जमिनीवरून वाद निर्माण झाल्यामुळं रोहिदास शिरसाठ यांनी तहसील कार्यलयासमोर उपोषण सुरू केलंय. त्यांना घेऊन दमानिया यांनी तहसीलदारांची भेट घेतली.
मात्र एकनाथ खडसेंचे स्वीयसाहाय्यक योगेश कोलते हे तहसीलदारांच्या दालनात आले. ते तहसिलदारांच्या बैठक व्यवस्थेजवळ असलेल्या खुर्चीजवळ बसले. यावर दमानिया यांनी आक्षेप घेतला. त्यावरून वातावरण अधिकच चिघळले. त्यामुळं दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. तहसिलदारांनी पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण केलं. मात्र तहसीदारांच्या दालनाबाहेरही मोठी गर्दी जमली होती.