राळेगणसिद्धी: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सकाळी बाथरुममध्ये अण्णा कोसळले, त्यानंतर त्यांना आता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताप आणि अशक्तपणामुळे अण्णा कोसळल्याची प्रतिक्रिया डॉक्टरांनी दिली आहे. तसंच त्यांची प्रकृती स्थिर आहे, काळजी करण्याचं कारण नाही, असंही डॉक्टर म्हणाले आहेत. आणखी 2 दिवस अण्णांना नोबेल हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात येणार आहे. 


गेल्या 2 दिवसांपासून अण्णांची तब्येत बरी नव्हती, पण त्यांनी गावातील विकासकामांची पाहणी केली. कडक उन्हामुळे त्यांना त्रास झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. 


सकाळी बाथरुमला गेले असताना ते तिथेच पडले, त्यांचा सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांना ही गोष्ट जवळपास एक तासानं लक्षात आली, आणि त्यांनी अण्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.