औरंगाबाद : कन्नडमध्ये 'सैराट'मधील आर्ची-परशाला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या चाहत्यांना धक्काबुक्की झालेय. शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी ही धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या बंगल्याजवळ आर्ची-परशाला पाहण्यासाठी तुफान गर्दी झाली होती. यामध्ये शाळकरी लहान मुले मोठ्याप्रमाणात होती. आर्ची आणि परशा यांचे आगमन होतात त्यांना पाहण्यासाठी चाहते आले होते. मात्र, गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. यावेळी जाधव यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांनी मुलांना धक्काबुक्की केली, असे अनेकांनी सांगितले.


आमदारांच्या सुरक्षा रक्षकांनी शाळकरी मुलांना धक्काबुक्की केल्याचे वृत्त समजताच अनेक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेय. दरम्यान, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.