नाशिक : लष्कराच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी तीन अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी  निफाडमधून तिघांना अटक करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक करिअर अकॅडमीचे संचालक अटकेत सापडल्याने पुन्हा खळबळ माजलीय. संदीप नागरे, किरण गामने हे सापडले आहेत. त्यासोबतच संदीप भुजबळ या विद्यार्थ्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, परीक्षेसाठी बोगस रहिवास प्रमाणपत्र व परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणार आहेत. त्यासाठी संबंधितांकडून चार ते पाच लाख रुपये घेणार आहेत, अशी माहिती पोलिसांना दिली.  


लष्कराच्या भरतीचे पेपर फुटल्याने देशभरातील लष्कराची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. देशभरात रविवारी लष्कर भरतीसाठी परीक्षा घेतली जाणार होती. मात्र पेपर फुटल्यामुळे लष्कर भरतीची परीक्षा रद्द करण्यात आली. 


नागपूर, अहमदाबाद, गोवा, किर्की आणि इतर ठिकाणी होणारी लष्कर भरती परीक्षा रद्द झाल्याचे लष्करातील सूत्रांनी सांगितले आहे. क्लर्क, स्ट्राँगमन, ट्रेड्समन या पदांसाठी देशभरातील ५२ केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार होती. मात्र ही पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली.


शनिवारी संध्याकाळी रविवारी लष्कर भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे पेपर फुटल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा महाराष्ट्र आणि गोव्यात छापेमारी केली. यामध्ये पोलिसांनी १८ आरोपींसह तब्बल ३५० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.