जयेश जगड, अकोला : सध्या अकोल्यात दोन निर्णयांची चर्चा सुरूय... एक निर्णय मोदींचा आणि दुसरी चर्चा सुरूय अशोक कौलकर यांच्या स्पेशल ऑफरची... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोल्याच्या रामदासपेठ भागातल्या अनंता हेअर सलून दुकानात कालपासून गर्दी झाली आणि ही गर्दी दुपारी १२ ते ४ या वेळेत होतेय. कारण या वेळात मोफत दाढी कटिंग करून मिळतेय.


ही स्पेशल ऑफर दिलीय अनंता कौलकर यांनी... त्याचं कारण आहे पंतप्रधांनानी पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याचं... अनंता यांनी या निर्णयाचं असं हटके स्वागत केलंय.


सामान्यांना त्रास होत असला तरी आपण या निर्णयाचं स्वागत करत असल्याचं ते म्हणतायत. दोन दिवस ही स्पेशल ऑफर असणार आहे.


देशभरात मोदींच्या निर्णायची चर्चा सुरूय पण अकोल्यात त्यासोबतच अशोक यांच्या निर्णयाचीही चर्चा सुरू आहे.