अश्विनी एकबोटे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
मराठी चित्रपटसृष्टी, मालिका, रंगभूमीवर आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्यावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुणे : मराठी चित्रपटसृष्टी, मालिका, रंगभूमीवर आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्यावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी गिरीश परदेशी, सचिन देशपांडे, अनिल नगरकर, विक्रम गोखले, माधव अभ्यंकर, मेघराज भोसले, मुक्ता बर्वे, श्रुती मराठे आदी मराठी चित्रपटसृष्टीतील मंडळी अंत्यदर्शनासाठी उपस्थित होती.
अश्विनी यांना पुण्यातील भरत नाट्य मंदिरात प्रयोग सुरु असताना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. रंगभूमीवरुन त्यांची ही एक्झिट प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी ठरलीये.
भरत नाट्य मंदिरात नाट्य त्रिविधा कार्यक्रमात नृत्य सुरु असताना त्यांनी गिरकी घेतली आणि त्याचवेळी त्या जमिनीवर कोसळल्या. त्यानंतर त्यांना तातड़ीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रयोग सादर करत असतानाच या गुणी अभिनेत्रीने जगाचा निरोप घेतला.