डोंबिवली : जमिनीच्या वादातून डोंबिवलीतल्या घेसर गावातल्या भोईर कुटुंबांवर प्राणघातक हल्ला केला गेला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात लहू भोईर आणि त्यांची १८ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झालीय. लहू भोईर यांचा गेली अनेक वर्षं रघुनाथ मांगरुलकर यांच्याशी जमिनीच्या व्यवहारावरुन वाद सुरु आहे. लहू भोईर आणि रघुनाथ मांगरुलकर यांच्या गाड्या घेसर गावातून एकमेंकासमोरुन गेल्या. तेव्हा रघुनाथ मांगरुलकर यांच्याकडे फक्त पाहिलं म्हणून लहू भोईर यांना बेदम मारहाण केली गेली. 


यावेळी वडिलांना वाचवायला आलेल्या भोईर यांच्या मुलीलाही रघुनाथ आणि त्यांच्या बरोबर असलेल्यांनी मारलं. सोबतच लहू भोईर यांच्या गाडीची मोडतोडही केली.