गाडी बाजूला घ्यायला सांगितल्याने दोघा पोलिसांना बेदम मारहाण
गाडी बाजूला घ्यायला सांगितल्याचा राग येऊन सेवेवर तैनात दोघा पोलिसांना बेदम मारहाण केल्याची घटना रायगडमध्ये घडलीय.
अलिबाग : गाडी बाजूला घ्यायला सांगितल्याचा राग येऊन सेवेवर तैनात दोघा पोलिसांना बेदम मारहाण केल्याची घटना रायगडमध्ये घडलीय.
पांडुरंग भालेराव आणि विकास सुतार अशी मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे, अलिबाग तालुक्यातल्या आक्षी समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झालीय. म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
इथे समुद्रकिनारी वाळूत वाहनं न्यायला बंदी असतानाही, काही तरुणांनी आपल्या दुचाकी वाळूत उभ्या केल्या होत्या. याबाबत त्या तरुणांना या दोघा पोलिसांनी हटकलं. त्याचा राग येऊन स्थानिक तरुणांनी दोघा पोलिसांना मारहाण केली. त्यांच्यावर अलिबाग जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.