परभणी : आयसीस कनेक्शनप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकानं अर्थात एटीएसनं धक्कादायक माहिती कोर्टासमोर उघड केलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीतून संशयित म्हणून अटक केलेल्यांकडे मोठा स्फोटकां आणि शस्त्रांचा मोठा साठा असल्याची शक्यता एटीएसनं वर्तवलीय. 


विशेष न्यायालयात बंद दालनात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी अटक केलेल्या नासेरबिन याफई आणि मोहंमद शाहिद या दोघांनाही १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.


या दोघांचे आणखी काही साथीदार परभणीत असल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. त्यानुसार त्यांच्या साथिदारांचा शोधही सुरु आहे.