अमरावती :  अमरावतीत वडाली भागात परिहारपूरा भागात सुरु असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर धाड़ टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दारू विक्रेते आणि त्यांच्या सहका-यांनी हल्ला चढवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली. सर्व आरोपींवर गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती अमरावती पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिकांनी दिली. 


विशेष म्हणजे पोलीस पथकावरिल हल्ल्यात पुढाकार घेणा-या एका राज्य राखीव दलाच्या जवानाला या घटनेत आरोपी करण्यात आलंय.