औरंगाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के महिला आरक्षण कशासाठी असा प्रश्न एका घटनेमुळे निर्माण झालाय... औरंगाबादचे महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नवरोबांना महापालिका आवारात नो एंट्री केल्यानं नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केलीये... 


घरचे काम असतात म्हणून...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेच्या कामात हे पतीलोक उगीच ढवळाढवळ करत असल्याचं आयुक्तांचं म्हणणं आहे... मात्र हा आपल्या नवऱ्यांचा अपमान असल्याची बोंब नगरसेविकांनी मारलीये... आपण आजारी होतो, आपल्याला घरची कामं असतात असली कारणं या नगरसेविका देतायत... 


नवरोबांची ढवळाढवळ..


वॉर्डमध्ये आरक्षण लागल्यावर आपल्या बायकोला निवडणुकीत उतरवलं जातं. त्यानंतर पत्नीच्या नावानं हे नवरेच सगळी कामं करत असतात... मग यातून महिला सक्षमीकरण कसं काय होणार हा प्रश्नच आहे... 


औरंगाबादकराचा प्रश्न..


कामात नाहक ढवळाढवळ करणाऱ्यांना आयुक्तांनी चाप लावला असेल, तर त्यात गैर काय असा प्रश्न औरंगाबादकर विचारतायत...