मंत्री महोदय म्हणतात, `बॅचलर ऑफ जेल` हीच माझी पदवी
शिवसेनेत बढती मिळायला आपल्याला ३० वर्षं लागली. माझ्याविरुद्ध ३५ ते ४० पोलीस तक्रारी झाल्या म्हणून आपण मंत्री झालो, अशी बिनदिक्कत फटकेबाजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
अहमदनगर : शिवसेनेत बढती मिळायला आपल्याला ३० वर्षं लागली. माझ्याविरुद्ध ३५ ते ४० पोलीस तक्रारी झाल्या म्हणून आपण मंत्री झालो, अशी बिनदिक्कत फटकेबाजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
मंत्री होण्याच्या अगोदरही आपण जेलमध्ये होतो. त्यामुळे 'बॅचलर ऑफ जेल' म्हणजेच शिवसैनिक हीच आपली 'पदवी' असल्याचं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं.
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथे संत जनार्दन स्वामी भक्तनिवासात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वीरपत्नी, वीरमाता, शहीद जवानांचे कुटुंबिय आणि सेवानिवृत्त जवान तसंच त्यांच्या माता-पित्यांनाही गौरवण्यात आलं.