पुणे : बाहुबली 2 या सिनेमाने अनेक रेकॉर्ड केले आहेत, पण पुणे जिल्हा आणि शहरातही बाहुबलीने यावेळी रेकॉर्ड केला आहे. बाहुबलीने ५ कोटी ४८ लाखांचा करमणूक कर मिळवून दिला आहे. एका आठवड्यात हा करमणूक कर जमा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 हा चित्रपट अजून महिनाभर सर्व चित्रपटगृहांमध्ये राहण्याची शक्यता आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता महिनाभरात आणखी कोटय़वधींचा करमणूक कर वसूल होईल, अशी शक्यता जिल्हा प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.


सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात मल्टीप्लेक्स शिवाय ३१ चित्रपटगृहात सिनेमा दाखवला जातो, यातून सुमारे ४ कोटींचा महसूल जमा होतो. वर्षभरात ६५ कोटींच्या आसपास हा महसूल जमा होतो.


गेल्यावर्षभरात करमणूक कर विभागाकडे चित्रपटांच्या माध्यमातून सुमारे ६५ कोटींचा कर जमा झाला. २८ एप्रिलला एस. एस. राजामौली दिग्दर्शित बाहुबली 2 हा चित्रपट हिंदी, मल्याळमसह पाच भाषांत प्रदर्शित झाला. बिग बजेट, बहुचर्चित, उत्कृष्ट अ‍ॅनिमेशन आणि स्पेशल इफेक्ट यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली


'बजरंगी भाईजान' चित्रपटातून दोन आठवडय़ांमध्ये 1 कोटीच्या आसपास करमणूक कर वसूल झाला होता. तर बाहुबली 1 चित्रपटातून शहर आणि जिल्ह्य़ात 5  दिवसांमध्ये ७८ लाख रुपयांचा करमणूक कर वसूल झाला होता.