लाच मागणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्याला जामीन मंजूर
सॉफ्टवेअर मध्ये डाटा इंट्रीचे प्रलंबित बिल अदा करण्यासाठी एकूण रकमेच्या १५ टक्के रक्कम म्हणजेच 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल अटक केली होती. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना ३ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी काल अँटी करप्शन ब्युरोनं अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी विशेष न्यायालयानं इतवारे यांना जामीन मंजूर केला.
जालना : सॉफ्टवेअर मध्ये डाटा इंट्रीचे प्रलंबित बिल अदा करण्यासाठी एकूण रकमेच्या १५ टक्के रक्कम म्हणजेच 3 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने काल अटक केली होती. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना ३ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी काल अँटी करप्शन ब्युरोनं अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी विशेष न्यायालयानं इतवारे यांना जामीन मंजूर केला.
डाटा एंट्री ऑपरेटिंग करणाऱ्या एका खाजगी एजन्सी धारकाचं ६० लाख रूपयांचं बिल अदा करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी एकूण रकमेच्या १५ टक्के म्हणजे ४ लाख ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती, मात्र तडजोडी अंती ईतवारे यांनी ३ लाखांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने अँटी करप्शन ब्यूरोकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर इतवारे यांनी लाच मागितल्याच निष्पन्न झाल्यानंतर अँटी करप्शन ब्यूरोच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज इतवारे यांना जिल्हा विशेष न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना जामिन मंजूर केला.
तक्रारदार खाजगी कॉन्ट्रॅक्टर यांनी त्यांच्या एजन्सी मार्फत जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकसंख्या वही मधील माहिती राष्ट्रीय माहिती केंद्र एनआयसीच्या सॉफ्टवेअरमध्ये डाटा इंट्रीचे कंत्राट घेतले होते. या कामाचे देयक मिळविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्याकडे त्यांनी पाठपुरावा केला. मात्र इतवारे यांनी बजेट नसल्याच कारण पुढे करत 30 लाखाचा धनादेश देण्यासाठी 15% प्रमाणे 4 लाख 50 हजारांच्या लाचेची मागणी केली. परंतू तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्याने इतवारे यांनी 10 लाखांचा चेक देतो ते कॅश करुन माझ्या ठरलेल्या टक्क्याप्रमाणे पैसे द्या. नंतर मी तुमचे उर्वरित बिल मंजुर करतो, असं सांगितल. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान 13 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जाऊन पंचासमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी 4 लाख 50 रुपयांची मागणी करुन तडजोड अंती 3 लाख रुपये स्विकारण्यास तयार झाले आणि मध्यस्थ अहेमद शेख याला बोलावून तक्रारदाराला लाचेची रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगितल.
14 एप्रिल रोजी बचत भवन शासकीय निवास स्थान येथे सापळा रचला असता अतिक याने सापळ्याची चाहुल लागल्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. रितसर कायदेशीर प्रक्रिया आणि परवानगी घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे आणि अतिक शेख या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती.