पुणे :   कोंढवा बुद्रुक येथे तालाब कंपनीजवळ बेकरीमधे लागलेल्या आगीत ६ कामगारांचा जळून मृत्यू झाला. आज पहाटे ४:४२ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पोटमाळ्यावर हे सहा कामगार झोपले होते. दरम्यान, बेकरी मालकाने बेकरीला बाहेरुन कुलुप लावले होते. त्यामुळे या कामगारांना बाहेर पडता आले नाही अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. 


बेक्स अॅण्ड केक्स या बेकरीला बाहेरुन कुलुप असल्याने कामगार आतच अडकले. त्यामुळे आत झोपलेल्या सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.


या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस आणि पुण्याचे महापौर पोहोचले आहेत.


दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे :