बँकेच्या खात्यातून कोट्यवधींचा अपहार, दोघा मुख्य सूत्रधारांना अटक
महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून कोट्यवधींचा अपहार केल्या प्रकरणी औरंगाबादमधील दोन मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहर दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून आनंद लाहोटी आणि किरण गावडे या दोघांना अटक केलीय.
औरंगाबाद : महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून कोट्यवधींचा अपहार केल्या प्रकरणी औरंगाबादमधील दोन मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे. पुणे शहर दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून आनंद लाहोटी आणि किरण गावडे या दोघांना अटक केलीय.
या ठगांनी यूपीआय ऍप्लिकेशनद्वारे विविध खातेदारधारकांच्या ६ कोटी १४ लाखांच्या रकमेचा अपहार केला होता. या घोटाळ्यातल्या बुलढाणा, नाशिक, वाशीम इथल्या नऊ साथीदारांची नावं पोलिसांना मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्र बँकेतल्या खात्यात पैसे नसतानाही, युपीआय अप्लिकेशनद्वारे पैसे काढून त्याचा अपहार केल्याचं प्रकरण औरंगाबादमध्ये उघड झालं होते.
या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी पाच जणांना आधीच ताब्यात घेतलंय. या अपहाराणाचा मुख्य सूत्रधार आनंद लाहोटी असून, त्याने किरण गावडे याच्या सहाय्यानं आणि इतर साथीदारांच्या मार्फत महाराष्ट्र बँकेतल्या खातेदारांचे सिमकार्ड मिळवून कोट्यवधींचा अपहार केला होता.