कल्याण : मोदी सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर जुन्या नोटा बदलणाऱ्या गुन्हेगार मंडळींनी काळ्या बाजारात नव्या नोटा बदलून देण्याचा व्यवसाय सुरू केला. नोट बदलून देण्याप्रकरणी एका बॅंक व्यवस्थापकासह बिल्डर आणि अन्य एकाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोकडही जप्त करण्यात आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्राईम ब्रांचच्या कल्याण युनिटने सोमवारी रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून केलेल्या धरपकडीत बँकेच्या मॅनेजरसह एका बिल्डरला आणि व्यापा-याला ताब्यात घेतलंय. या त्रिकुटाकडून 30 लाख 41 हजारांचा नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.


चेतन पाटील या बिल्डरने सुंदरम सुब्रमण्यम या बँक मॅनेजरला जुन्या नोटा बदलण्यासाठी दिल्या होत्या. क्राईम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून दोघांकडून नव्या नोटा जप्त केल्या. तर याच ठिकाणी लावलेल्या दुस-या सापळ्यात मोहम्मद शेख याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून 17 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.