ठाणे : भाईंदरमध्ये झालेल्या मायलेकीच्या हत्या महिलेच्या प्रियकरानेच केल्याचं समोर आलं आहे, अखेर महिलेच्या प्रियकराने मायलेकीची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे.  मयत दीपिका पैशासाठी ब्लॅकमेल करत असल्याने आपण तिला ठार मारल्याचं विनायक एपूर या आरोपीने पोलिसांना सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२८ जानेवारी रोजी हत्या झाल्याचं उघड
या मायलेकींचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात मृतदेह सापडला, त्या दिवशी २८ जानेवारी ही तारीख होती.  २९ वर्षीय दीपिका संघवी आणि ९ वर्षांची  हेतलचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.


विनायक-दीपिकात प्रेमसंबंध
दीपिका आणि आरोपी विनायक हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीचे संबंध जुळले. आरोपी विनायकचे नेहमी दीपिकाच्या घरी येणे-जाणे होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध देखील असल्याचं म्हटलं जातं. दीपिकाचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नव्हते. त्यामुळे ती वेगळी रहात होती. दीपिकाची नोकरी गेल्यामुळे ती आरोपी विनायककडे पैसे मागत होती. याच पैशांवरुन दोघांमध्ये २५ जानेवारीला वाद झाला.


सीसीटीव्हीत आरोपी कैद
पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये विनायक सोसायटीच्या पायऱ्या उतरताना दिसला होता. त्याच आधारावर विनायकचा शोध पोलिस घेत होते. विनायक शिर्डीला गेला होता. अखेर पोलिसांनी त्याला दहिसरमधून अटक केली आहे.


अशी घडली घटना
हेतलचा आपल्या शाळेत २६ जानेवारीला डान्स होता. त्या डान्सची प्रॅक्टीस मायलेकी घरी करत होत्या. तर आरोपी विनायक हा माबाईलवर शुटींग करत होता. त्यानंतर दीपिका झोपली असताना विनायकने तिच्यावर वार करुन तिची हत्या केली. हत्या करताना हेतल जागी झाली आणि आपल्या आईची हत्या करत असल्याचं बघितलं. त्यामुळे ८ वर्षाच्या हेतललाही गळा दाबून विनायकने ठार मारलं आणि घटनास्थळावरुन फरार झाला.