भुसावळच्या राजकारणामुळे `शहर डर्टी`
दैनंदिन कर भरणाऱ्या भुसावळकरांचा संताप होतोय. शहरात नागरपालिकेतून केवळ निधी हडप केला जातो.
जळगाव : केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने देशभरातील ४३४ शहरांमध्ये केलेल्या स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेच्या क्रमवारीत जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर दुसऱ्या क्रमांकाचे घाणेरडं शहर ठरलंय. यामुळे दैनंदिन कर भरणाऱ्या भुसावळकरांचा संताप होतोय. शहरात नागरपालिकेतून केवळ निधी हडप केला जातो.
साफसफाईसह अनेक समस्यांवर मात्र पालिकेतील सत्ताधारी काहीच करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. त्यातच भुसावळचा ४३३ वा क्रमांक लागल्याने आता स्थानिक पातळीवर डर्टी भुसावळचं राजकारण रंगू लागलंय.
एकमेकांवर राजकीय चिखलफेक करण्यापेक्षा सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन बकाल झालेल्या शहराचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे हीच भुसावळकर नागरिकांची अपेक्षा आहे.